समाजकंटकांनी केले हे कृत्य, मोबाईल टॉवरच्या कॅबीनसह उपकरणांवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवल्या

गुरूवार, 3 मार्च 2022 (08:48 IST)
नाशिकमध्ये  बेळगाव ढगा परिसरात मोबाईल टॉवरच्या कॅबीनसह उपकरणांवर ज्वलनशील पदार्थ टाकून समाजकंटकांनी पेटवून दिल्याची घटना घडली. या घटनेत बॅट-यांसह उपकरणे जळून खाक झाली असून त्यात सुमारे दीड लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्ता प्रभाकर सगर (रा.जेलरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सगर एरटेल या नामांकित कंपनीचे सिक्युरिटी फिल्ड ऑफिसर आहेत. बेळगाव ढगा शिवारात एअरटेल कंपनीचा इंडस टॉवर आहे. अज्ञात समाजकंटकांनी गेल्या १२ फेब्रुवारी रोजी टॉवर परिसरात प्रवेश करून हे कृत्य केले. आरटीएन टावर्सच्या सेंटर कॅबीनचे नुकसान करीत भामट्यांनी टावर जेनरेटर बॅट-या आणि आयसीयू वायरींगवर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिल्या. या घटनेत उपकरणे जळून खाक झाली असून सुमारे दीड लाखाहून अधिक नुकसान झाले आहे.अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती