'त्या' प्राध्यापकाच्या हत्येचा झाला उलगडा, कुटुंबातील अल्पवयीन सदस्यानेच केली हत्या

सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (22:30 IST)
औरंगाबादमध्ये प्राध्यापक राजन शिंदे यांची 11 ऑक्टोबरला निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणाचा पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. धक्कादायक म्हणजे शिंदे कुटुंबातील अल्पवयीन सदस्यानेच ही हत्या केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. राजन शिंदे यांच्या हत्येसाठी वापरलेले डंबेल्स, रक्ताने माखलेला टॉवेल आणि चाकू घराजवळच्या विहिरीतून पोलिसांनी जप्त केला आहे.  
 
औरंगाबादच्या एन 2 भागात गेल्या आठवड्यात प्राध्यापक राजन शिंदे यांच्या खून झाला होता.  राहत्या घरी त्यांच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्यारानं वार कऱण्यात आले होते. त्यांच्या हाताच्या नसाही कापण्यात आल्या होत्या. या खुनाचा तपास करण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. घरातीलच कुणीतरी खून केला असावा असा पोलिसांना संशय होता. 
 
त्यानुसार पोलिसांची 3 पथक तपास करत होती. घरासमोरील विहिरीत खून केल्यानंतर खुनासाठी वापरलेली हत्यार टाकण्यात आल्याचा पोलिसांना संशय होता त्यानुसार विहिरीतून पाणी उपसून खुनाकरिता वापरलेली हत्यार जप्त करण्यात आली.  अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकारणात पोलिसांनी तपास करण्यात यश मिळवलं आहे. प्राध्यापक शिंदे हे औरंगाबादच्या मौलाना आझाद कॉलेज मध्ये इंग्रजी विषयाचे विभाग प्रमुख होते.
 
प्राध्यापक शिंदे आणि अल्पवयीन सदस्य यांच्यात वैचारिक मतभेद होते, करियर आणि शिक्षण याबाबत दोघांमध्ये खटके उडत होते, नातवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक यामुळेही राग होता. घटने आधी रात्री दोघांमध्ये जोरात भांडण झाले, त्यांतून शिंदे अल्पवयीन सदस्याला रागावले आणि तो राग मनात धरून खून झाला. खून करण्यासाठी त्याने वेब सिरीज  पाहिल्या. त्यातून त्याने खून करण्याचं ठरवलं. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती