यासाठीच मिठी नदी साफ केली जात नव्हती, आमदार लाड यांची खोचक टीका

सोमवार, 29 मार्च 2021 (09:27 IST)
उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेर कारमध्ये स्फोटके सापडली होती. त्या प्रकारानंतर कारचा मालक मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू झाला. यातील स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास NIAकडे होता तर हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास महाराष्ट्र ATSकडे होता. पण काही दिवसांपूर्वी दोन्ही प्रकरणांचा तपास NIAकडे आला. त्यानंतर हिरेन मृत्यूप्रकरणी NIAने रविवारी बीकेसी परिसरातील मिठी नदीत शोधकार्य करत महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले. सचिन वाझेने गुन्ह्यातील महत्वाचे पुरावे मिठी नदीत फेकल्याचे समजल्यानंतर ही शोधमोहिम राबवण्यात आली होती. या प्रकरणावरून भाजपच्या प्रसाद लाड यांनी शिवसेनेला टोला लगावला.
 
खरं तर, मुंबई महापालिका प्रशासन गेले अनेक महिने मिठी नदी साफ का करत नाही असा प्रश्न साऱ्यांना पडला होता. त्याचं उत्तर आज साऱ्या जनतेला मिळालं. यांची केलेली पापं मिठी नदीत टाकली होती. मिठी नदी साफ केली तर ही पापं जनतेसमोर येतील आणि यांचं बिंग फुटेल म्हणूनच मिठी नदी साफ केली जात नव्हती”, अशी खोचक टीका लाड यांनी केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती