काळजी घ्या, जीभ स्वच्छ न केल्यास हे त्रास उद्भवू शकतात

शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (09:40 IST)
दात स्वच्छ करणे हे महत्त्वाचे आहे सर्वाना माहीत आहे पण दातासह जीभ स्वच्छ करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे दात स्वच्छ करण्यासह जीभ देखील स्वच्छ करावी अन्यथा काही त्रास उद्भवू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
 * अकाळी दात पडतात  -
जर नियमितपणे दातासह जीभ स्वच्छ केली नाही ते अकाळी दात पडण्याची भीती असते. जीभ स्वच्छ न केल्याने बेक्टेरिया तयार होतात आणि त्यामुळे अकाळी दात पडतात. म्हणून दातासह जीभ देखील स्वच्छ करा. 
 
* हिरड्या कमकुवत होतात -
 असे नाही की दात स्वच्छ केल्याने हिरडे बळकट होतात जर आपली इच्छा आहे की हिरडे नेहमी बळकट राहावे तर या साठी नियमितपणे जिभेची स्वच्छता करावी. जिभेची स्वच्छता न केल्याने जिभेवर असलेले बेक्टेरिया हळू हळू हिरड्यांना कमकुवत करतात. म्हणून नियमितपणे जीभ स्वच्छ करावी.  
 
* जिभेवर छाले होणं -
बऱ्याच वेळा जिभेची स्वच्छता केली नाही तर जिभेवर छाले होतात.असं होऊ नये म्हणून नियमितपणे जिभेची स्वच्छता करावी .जर आपण दिवसातून दोन वेळा ब्रश करता तर दोन्हीवेळा जिभेची स्वच्छता करावी असं केल्याने तोंडात छाले होणार नाही 
 
* तोंडाला वास येणं- 
बऱ्याच वेळा असे वाटते की काही खाण्या-पिण्याने तोंडाचा वास येत आहे परंतु जिभेची स्वच्छता न केल्याने देखील तोंडाचा वास येतो ह्याचे कारण म्हणजे की स्वच्छता न केल्याने जिभेवर बेक्टेरिया उद्भवू लागतात.बऱ्याच वेळा जिभेची स्वच्छता न झाल्याने अन्नाची चव देखील लागत नाही म्हणून दात स्वच्छ करण्यासह जिभेची स्वच्छता देखील नियमितपणे करावी.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती