ठाण्याच्या श्रीनगर यां भागातील प्रभाग 16 मधील शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम होता. या करिता नारळ फोडण्यासाठी प्रभागातील उमेदवार माणिक पाटील, गुरुमितसिंग स्यान आणि डॉ जितेंद्र वाघ उपस्थित होते. तर पाटील यांच्या पत्नी शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका संगीता पाटील घटनास्थळी आल्या होत्या . यावेळी आधीपासून आय दोघात घरघुती मोठे वाद आहेत. तर तेव्हा पाटील यांनी इतकी वर्ष कुठे होता असा पती प्रश्न करताच झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर माणिक पाटील यांनी पत्नी संगीता यांच्यावर प्रचाराचा नारळ भिरकावून जखमी केले आहे. पत्नी संगीता पाटील आणि तिचे समर्थक यांनी श्रीनगर पोलीस ठाणे तक्रारीसाठी धाव घेतली आहे. या दोघांचे भांडण पूर्ण परिसराला माहित आहेत.