एटीएसची कारवाई: औरंगाबाद, मुंब्रा संशयित अतिरेक्यांना अटक

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) औरंगाबाद आणि मुंब्रा येथून अटक केलेले इसिस समर्थक ‘उम्मत-ए-मोहंमदिया’ ग्रुपच्या माध्यमातून काश्मिरातील अतिरेक्यांशी चॅटिंग करीत होते. तसेच, त्यांनी काश्मीरच्या अतिरेक्यांना पैसे पुरविल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यावरून न्यायालयाने सर्व संशयित अतिरेक्यांना पुन्हा 18 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
 
जमान नवाब खुटेउपाड, सलमान सिराजोद्दीन खान, फहाद मोहंमद इस्तेयाक अन्सारी, मजहर अब्दुल रशीद शेख, मोहंमद तकी ऊर्फ अबू खालिद सिराजोद्दीन खान, मोहसीन सिराजोद्दीन खान, मोहंमद मुशाहिद उल इस्लाम, मोहंमद सर्फराज ऊर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी आणि तल्लत ऊर्फ अबुबकर हनीफ पोतरीक, अशी संशयित अतिरेक्यांची नावे आहेत. 
 
यांच्यापैकी मोहसीन हा अतिरेक्यांच्या संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले. इसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र एटीएसने औरंगाबाद आणि मुंब्रा येथे 21 जानेवारीला छापेमारी करून नऊ संशयितांना अटक केली होती. ते विविध धार्मिक स्थळांच्या महाप्रसादात विषप्रयोग करून नरसंहार करण्याच्या तयारी होते. तसेच, पिण्याच्या पाण्यात विष घालवून घातपात करण्याचा त्यांनी कट रचला होता, असा आरोप एटीएसने केला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती