नागपुरात भीषण अपघात, कारने दुचाकीला उडवले, तिघांचा मृत्यू

सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (18:59 IST)
नागपूर येथे भीषण रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू झाला. नागपूरच्या केळवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
 
या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पीडितांची ओळख पटवली जात आहे. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

 नागपूर-छिंदवाडा महामार्गावर सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी अज्ञात कारचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. 
Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती