मुलांना सांभाळा…. जिल्ह्यात २४ तासांत १६५ लहान मुलांना झालाय कोरोना !

गुरूवार, 27 मे 2021 (20:58 IST)
राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट कमी होताना दिसत आहे मात्र लहान मुलांचे कोरोना बाधित होण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे, १८ वर्षांखालील रुग्णांसाठी आद्याप लस उपलब्ध झालेली नसल्याने लहान मुलांची काळजी घेणं महत्वाचे आहे.
 
 कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी घातक असल्याचे सांगण्यात येत असल्याने बाधित मुलांच्या आकेडवारीकडेही लक्ष लागले आहे. मात्र, प्रशासनाकडून ही आकडेवारी अदयाप वेगळी उपलब्ध करून दिली जात नाही.
 
असे आहेत बाधित … गेल्या २४ तासांत बाधित आढळून आलेल्या रुग्णांच्या यादीतून माहिती घेतली असता जिल्ह्यात १ ते १४ वयोगटातील १६५ बालके तर १५ ते १७ वयोगटातील ८० बाधितांची नोंद झाल्याचे आढळून येते.
 
टास्क फोर्स सुरू :- दरम्यान या वयोगटांतील रुग्णांवर विशेष लक्ष देण्यासाठी टास्क फोर्स सुरू करण्यात आलेले आहेत.
 
हॉस्पिटलमध्ये सज्जता ठेवण्यावर भर :- त्यातून हॉस्पिटलमध्ये सज्जता ठेवण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. बाधित रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण स्थानिक आरोग्य विभागाला मान्य नसल्याचे दिसून येते.
 
आकडेवारीत तफावत :- शिवाय आकडेवारीत अचानक तफावत आढळून आल्यास रुग्णालयांकडून एकदम माहिती भरली जात असल्याने असे प्रकार होत असल्याचे सांगून प्रशासन एकप्रकारे ढिसाळपणाला पाठीशी घालत असल्याचे दाखवून देते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती