आपल्या आहारात या 5 गोष्टी समाविष्ट करा डोळे निरोगी राहतील

बुधवार, 26 मे 2021 (19:36 IST)
डोळ्यांची नियमित काळजी घेणे देखील महत्वाचे आहे.आपण हे न केल्यास, डोळ्यातील अनेक प्रकारची समस्या वाढू शकते.जसे की चष्मा लागणे, चष्म्याचा नंबर वाढणे,मोतीबिंदू होणे, डोळ्यातून पाणी येणे, जळजळ होणे, लालसरपणा इ. तसेच,आजकाल मोबाईल आणि लॅपटॉपचा वापरही वाढला आहे, म्हणून डोळ्यांची काळजी घेणे देखील फार महत्वाचे झाले आहे. डोळ्यांची काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या -
 
1 स्वच्छ पाण्याने डोळे धुवावे- दररोज सकाळी ब्रश केल्यानंतर, तोंडात पाणी भरून घ्या आणि डोळ्यावर पाणी मारा.या मुळे डोळ्याची दृष्टी वाढते,डोळे जळजळ देखील करत नाही.जर डोळ्यात जळजळ होत आहे तर डोळ्यावर काकडी ठेवून 15 मिनिटे झोपा.असं केल्याने डोळ्यांना विश्रांती मिळेल.डोळ्यात जळजळ देखील होणार नाही. 
 
2 बदाम,शोप,खडीसाखर - हे तिन्ही समप्रमाणात घेऊन दळून घ्या.दररोज रात्री 1 चमचा हे मिश्रण घेऊन झोपून जा.लक्षात ठेवा की हे घेतल्यावर आपल्याला 2 तास पाणी प्यायचे नाही.1 महिने हे सतत करा.याचे चांगले परिणाम मिळतील.
 
3 आवळा- आवळा व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहे. याचे सेवन   केल्याने डोळ्याची दृष्टी वाढते. आपण आवळ्याचा मोरावळा किंवा भुकटीचे सेवन करू शकता. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.तसेच केस देखील चांगले होतील.
 
4 गाजर - गाजर हंगामी भाजी आहे. हे डोळ्यांसाठी सर्वोत्कृष्ट असल्याचे म्हणतात. त्यात फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि आयरन मुबलक प्रमाणात आढळते. नियमितपणे गाजरचे सेवन केल्यास डोळ्याची दृष्टी वाढते. 
 
5 व्हिटॅमिन ई - नट आणि शेंगांमध्ये व्हिटॅमिन ई जास्त आढळते. सूर्यफूलाचे बियाणे देखील डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगितले आहे.शेंगदाणे आणि पीनट बटर खाल्ल्याने डोळेही निरोगी राहतात.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती