दगडूशेठ गणपती मंदिरात शहाळे महोत्सव, तब्बल ५०० शहाळ्यांमध्ये गणपती बाप्पा विराजमान

बुधवार, 26 मे 2021 (16:06 IST)
पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. महोत्सवात तब्बल ५०० शहाळ्यांमध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले. 
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांच्या हस्ते गणेश जन्माची पूजा व अभिषेक झाला. बुधवारी सूर्योदयाच्या वेळी हा गणेशजन्म सोहळा पार पडला. तसेच मंदिरामध्ये गणेशयाग देखील झाला. वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या यासोबत वैश्विक महाविघ्न कोरोना लवकर दूर होण्याकरीता गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, ही भावना महोत्सवामागे होती.
 
आता  दुस-या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती