कोरोना नियमांचे उल्लंघन; 18 हॉटेल, रेस्टॉरंट, हुक्काबार, बिअर शॉपी पोलिसांकडून सील

मंगळवार, 25 मे 2021 (22:07 IST)
पिंपरी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 18 हॉटेल, रेस्टॉरंट, हुक्काबार, बिअर शॉपीला पोलिसांकडून सील ठोकण्यात आले.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन लागू केले असून जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सकाळी सात ते अकरा यावेळेत परवानगी आहे. हॉटेल ऑनलाईन घरपोच सेवा पुरवू शकतात. जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तरीही, या हॉटेल चालकांनी नियमांचे उल्लंघन करीत हॉटेल सुरु ठेऊन गर्दी जमवली.
दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील  कारवाईसाठी पोलिसांनी तीन पथके नेमली होती. या पथकांनी हिंजवडी-माण, पुणे बेंगलोर हायवे, बावधन परिसरातील हॉटले, बिअर शॉपी, रेस्टॉरंटवर कारवाईचा बडगा उगारला. हिंजवडी पोलिसांनी यापूर्वी सूचना देऊन देखील हॉटेल, हुक्काबार सुरु असल्याने मुळशी तहसिलदार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. तहसिलदारांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. या हॉटेल, रेस्टोरंन्टवर गुन्हे दाखल झाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती