ते म्हणाले की करोनामुळे यंदा पर्यटन व्यवसायावरही उतरती कळा आली असल्याने जिप्सीचालक आणि त्यांच्या परिवारावर आर्थिक संकट कोसळले. मात्र, वनविभागाच्या, विविध समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांना आवश्यक ती मदत केली जात आहे. त्यांनी म्हटले की व्याघ्र प्रकल्प सुरक्षित आहे. कारण वनाधिकारी व कर्मचारी त्यांच्या त्यांचे कर्तव्य पार पाडत आहे. कोवीड-19 च्या संकटाने जिप्सीचालक, मार्गदर्शक आणि ग्रामस्थांची भूक भागविण्यासाठी जीवनाश्यक वस्तूंचे वितरण करून, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने सामाजिक दायित्व जपले हे जास्त कौतुकास्पद आहे, असा उल्लेख त्यांनी केला. दरम्यान, ताडोबातील वाघ, बिबट व इतर वन्यप्राण्यांना करोनाची भीती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.