शिपाई विजय जाधव (वय-३८) याचा पहिल्या पत्नीसोबत बारामती कोर्टात गेले तीन वर्षांपासून केस सुरू असून, २४ डिसेंबर २०१६ ला एका महिलेसोबत लपून विवाह केला आहे. यात नवीन महिलेने दावा केला आहे की, त्याने आणि त्यांच्या कुटुंबियांनी पहिल्या लग्नाची ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली होती. तसेच, पहिल्या पत्नीसोबत त्याचा घटस्फोटही झाला नाही. दुसरी बायको माहेरी जाताच विजय जाधवने थेट तिसऱ्या बायकोसाठी स्थळ शोधणे सुरू केले. १२ डिसेंबर २०१७ मध्ये त्याने तिसरे लग्न केले आहे.
विशेष म्हणजे त्याने तिसऱ्या बायकोपासूनही पहिली दोन लग्नं झाल्याची माहिती लपवली आहे. या महिलेने आरोप केला आहे की, त्याने तीसऱ्या लग्नातही मुलींकडच्या मंडळीकडून ५०,००० रूपये हुंडा म्हणून घेतले आहेत. हा सर्व प्रकार पाहून पोलीसही आवाक झाले आहेत. त्यामुळे त्याचे खात्यातून निलंबन देखील केले आहे.