या प्रकारची कारवाई सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी केली असून त्याबाबत माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. 28 तारखेला ही चोरी झाली आहे या चोरीनंतर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांशी संबंधित सर्व कागदपत्रे सुरक्षित असल्याचाही खुलासा त्यांनी केला आहे. सीआयडी ने यापूर्वीच या घोटाळ्यासंबंधीच्या सर्व फाईल्स कागदपत्रे स्वत:च्या ताब्यात घेतली आहेत. या कार्यालयात अन्य फायली संगणक वगळता फार काही नव्हते, असा दावा दिलीप कांबळे यांनी केला आहे.