स्टार क्रिकेटपटू आता कोणतीही डिमांड करू लागले आहे. यामध्ये त्यांनी भारतीय खेळाडूंच्या पत्नी व प्रेयसींच्या निवास आणि पर्यटनाची व्यवस्था करण्यासाठी वेगळा अधिकारी दौऱ्यावर पाठविण्यात यावा अशी मागणी केली होती. तर त्यांना सुरक्षाव्यवस्था पूरवा असेही मागणी केली होती. मात्र क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि प्रेयसींच्या राहण्याची व्यवस्था भारतीय बीसीसीआयकडून करण्यात येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीने (सीओए) घेतली आहे. त्यामुळे आता कोणतीही व्यवस्था बोर्ड करणार नाही हे उघड झाले आहे.
जेव्ह्या आफ्रिकेचा दौरा सुरु झाला तेव्हा भारतीय संघातील खेळाडूंपैकी विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, मुरली विजय, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा या खेळाडूंना पत्नीबरोबर दोन आठवडे राहण्याची परवानगी बीसीसीआयनं दिली. आमत्र आता ती परवाणगी बीसीसीआयकडूनच फेटाळण्यात आली आहे. पत्नी आणि प्रेयसी खेळाडूंबरोबर द. आफ्रिका दौऱ्यावर आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी एका स्पेशल अधिकारी दिला जावा तर हा अधिकारी क्रिकेटपटूंच्या कुटुंबीयांच्या गरजेनुसार त्यांना पर्यटन, तसेच कार्यक्रमांच्या आखणीचे काम पाहणार होता. पण त्याआधीच बीसीसीआयची योजना सीओएनं फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता प्रत्येकालाच आपल्या बायकांची आणि प्रेयसीच्या राहण्यापासून ते मनोरंजानापर्यंतची सगळी सोय करावी लागणार आहे.