बीसीसीआयने विराटला निराश न करता ब्रेक दिला आहे. एक महिन्याचा ब्रेक घेल्यामुळे निश्चितच आता अनुष्का आणि विराटच्या फॅन्सला लग्नाची शहनाई ऐकू येण्याची शक्यता वाढली आहे. कधी लपून-छिपून भेटणारं हे जोडपं आता सरेआस लोकांसमोर वावरतं आहे. हल्लीच एका जाहिरातीत दोघे सात वचन घेताना दिसले आहेत. नंतर दिवाळीदरम्यान आमिर खानच्या एका स्पेशल शोमध्येही दोघे सोबत दिसले होते. जिथे पहिल्यांदा विराटने दोघांबद्दल उघडपणे गोष्टी केल्या. त्याच शो मध्ये विराट म्हणाला होता की अनुष्का आपल्या नात्याबद्दल खूप ईमानदार आहे आणि मी तिला नुष्की हाक मारतो.