संजय राऊत यांच्या कन्येच्या लग्न समारंभात सुप्रिया सुळे आणि राऊतांचा डान्सचा व्हिडीओ व्हायरल

सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (11:04 IST)
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुलगी पूर्वशी राऊत आज 29 नोव्हेंबर रोजी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार नार्वेकर यांच्याशी लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्न सोहळ्याआधी राऊत कुटुंबाकडून मुंबईत संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमातील संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या डान्स व्हिडिओची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा होत आहे.
या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी आग्रह करत संजय राऊत यांना एका गाण्यावर ठेका धरण्यास भाग पाडलं. सुळे यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही नृत्यात सहभागी व्हायला लावल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती