स्वतःची चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या

शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 (15:42 IST)
बुलडाणाच्या धोत्रा भनगोजी या गावातील माजी महिला सरपंच आशा इंगळे (५५) यांनी स्वतःची चिता रचून आत्महत्या केली आहे. त्यांची दोन मुले रोजंदारीवर काम करत असून एका मुलीचे लग्न झालेले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ८० ते ९० हजार रुपयांचे कर्ज आहे. तसेच सावकाराचे थोडे कर्ज होते. थकबाकी फेडण्यासाठी कर्जदार तगादा लावत असल्यामुळे त्या तणावाखाली होत्या. आशा इंगळे यांच्या पतीचे २००८ मध्ये निधन झाले होते. दोन्ही मुले रोजंदारीवर असल्यामुळे त्या एकट्याच शेती बघत होत्या. 
 
आशा इंगळे यांच्या दिराने सांगितले की, “साडे तीन एकरात फक्त दहा पोती सोयाबीनचे उत्पन्न झाले होते. मुलाचेही उत्पन्न फारसे नव्हते. त्यामुळे आशाताई खुप तणावात होत्या आणि त्यातूनच त्यांनी रात्री स्वतःचे सरण रचून आत्महत्या केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती