पिज्जा खा, 40 हजार मिळवा

शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 (08:48 IST)
आर्यलँडची राजधानी असलेल्या डबलिन मध्ये एका रेस्टॉरंटने 35 मिनिटात 32 इंची पिज्जा फस्त करणाऱ्याला 40 हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. पिनहेड्स पिज्जा रेस्टॉरंट असे त्याचे नाव आहे. आतापर्यंत 100 लोकांनी हा पिज्जा खाण्याचे आवाहन स्वीकारलं पण ते अयशस्वी झाल्याचे या रेस्टॉरंटच्या मालकाने सांगितले आहे.
 
अँथोनी केली असे या रेस्टॉरंट मालकाचे नाव आहे. केली यांनी याआधीही अशाच प्रकारे पिज्जा खाण्याच्या अनेक स्पर्धा भरवल्या होत्या. पिज्जा खाणाऱ्याला त्यांनी पण कोणालाही 35 मिनिटात एवढा भलामोठा पिज्जा खाणे शक्य झाले नाही. जो कोणी हा पिज्जा खाऊन दाखवेल त्याचे नाव जगप्रसिद्ध लोकांच्या यादीत समाविष्ट केले जाणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती