सुब्रमण्यम स्वामी म्हणतात, पंढरपूरला जाऊन स्थानिकांशी चर्चा करणार

गुरूवार, 11 ऑगस्ट 2022 (16:15 IST)
भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारवर हिंदूंच्या मंदिरांच्या सरकारीकरणाचा आरोप केला आहे. तसेच या विरोधात पंढरपूरला जाऊन स्थानिकांशी चर्चा करणार असल्याची माहिती देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं स्वामींनी जाहीर केलं. मुंबईत इस्कॉन मंदिरात वारकरी पाईक संघ आणि इतर संघटनांनी सुब्रमण्यम स्वामींची भेट घेतली. त्यानंतर स्वामी मुंबईत बोलत होते.
 
सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, “पंढरपुरात हिंदू भक्तांना त्रास दिला जातोय. सरकारने हिंदू मंदिरे हडपली आहेत. ही मंदिरं सरकारच्या ताब्यातून सोडवण्यासाठी मी स्वतः पंढरपुरात जाऊन लोकांना भेटणार आहे. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करेन. भगवान कृष्णांना सर्वजण मानतात. हिंदूंच्या पुनर्उत्थानासाठी हे करणं आवश्यक आहे असे सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती