पंढरपुरात वारकऱ्यांना बासुंदीतून झाली विषबाधा

सोमवार, 18 जुलै 2022 (10:12 IST)
पंढरपुरातील शेगाव दुमाला येथे विठ्ठल आश्रमात रविवारी दुपारी जेवण्यात खाललेल्या बासुंदीमुळे 40  वारकऱ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जेवणानंतर सर्वांना पोटदुखी, उलट्या, जुलाबचा त्रास होऊ लागला. त्यांना सरबवाना तातडीने रात्री पंढपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, नदीपलीकडे असलेल्या शेगाव दुमाला येथे श्री विठ्ठल अआश्रम मठात चातुर्मासाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी अनेक वारकरी मुक्कामी आहे. या वारकऱ्यांनी रविवारी दुपारी जेवण केले आणि जेवणात बासुंदी, भाजी, चपाती, भजी असा बेत होता. सर्वानी बासुंदी खाल्ल्या नंतर अनेकांना पोटदुखी, उलट्या, जुलाब असा त्रास होऊ लागला. अनेकांना त्रास होत असल्याचे निर्दशनास आल्या नंतर जेवणातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु झाले आणि आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना बासुंदीतून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्व अन्नपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती