महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सरकारी अनुदानित आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. एका अधिकारींनी सोमवारी ही माहिती दिली आहे. डहाणू प्रकल्पाचे अधिकारी सत्यम गांधी यांनी सांगितले की, राज्याच्या आदिवासी प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी शाळेत पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 17 वर्षीय मुलीने रविवारी शाळेच्या शौचालयात दुपट्ट्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला, असे अधिकारींनी सांगितले. ते म्हणाले की, “जेव्हा मुलगी बराच वेळ बाहेर आली नाही, तेव्हा शिक्षक आणि सुरक्षा कर्मचारी आत गेले. तर त्यांनी हे दृश्य पहिले. विद्यार्थिनीला तातडीने कासा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. नंतर तिला पुढील उपचारासाठी सिल्वासा येथे नेण्यात आले. तिने हे पाऊल का उचलले अद्याप अजून समजले नाही.