यवतमाळ : भरून वाहणारा नाला ओलांडतांना तरुण गेला वाहून

सोमवार, 2 सप्टेंबर 2024 (13:30 IST)
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एक तरुण पूस नदीचा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत होता, पण पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्याला तो ओलांडता आला नाही आणि तो पाण्यात वाहून गेला.
 
एका तरुणाने ही घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली होती आणि आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू आहे. तसेच यवतमाळमध्ये  अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा कहर केवळ यवतमाळच नाही तर आसपासच्या भागात पाहायला मिळत आहे. तसेच मुसळधार पावसामुळे नाले आणि नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून त्यामुळे पूरस्थिती अजूनही कायम आहे. या वादळी पावसामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. व जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती