ट्रक व वाहतूकदारांचा संप अखेर मागे!

मंगळवार, 2 जानेवारी 2024 (20:21 IST)
नाशिक जिल्ह्यातील इंधन कंपन्यांच्या वाहतूकदार संघटनांनी सरकारने अपघाताबाबत बनवलेल्या कायद्याविरोधात सोमवारपासून संप पुकारला होता. या संपात सुमारे 1 हजार 500 टँकरचालक उतरले होते. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील 12 जिल्ह्यांतील इंधन पुरवठा झाला होता.
 
या पार्श्वभूमीवर आज मनमाडच्या पानेवाडी इंधन प्रकल्पात टँकर चालकांसोबत प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत तोडगा निघाला असून वाहतूकदारांनी काम करण्यास मान्य केले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील वाहतूकदारांचा संप अखेर मिटला आहे.
 
आज मनमाड मनमाडच्या पानेवाडी इंधन प्रकल्पात टँकर चालकांसोबत जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस अधिक्षक शहाजी उमप, प्रकल्प अधिकारी, आरटीओ, पोलीस प्रशासन यांच्यात बैठक पार पडली. कालपासून प्रशासनासोबत झालेल्या तीन बैठका निष्फळ ठरल्या होत्या.
 
मात्र आज जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला आहे. त्यामुळे आता नाशिक, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील 12 जिल्ह्यांतील इंधन पुरवठा पूर्ववत होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती