मिळालेल्या माहितीनुसार या घटनेनंतर काही काळ मिरवणूक थांबवण्यात आली व दोन्ही समाज समोरासमोर आल्याचेही बातमी समोर आली आहे. तसेच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अकोला एसीपी अनमोल मित्तल यांनी सांगितले की, काही काळ दगडफेक झाली, पण पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून तणाव शांत केला आणि मिरवणूक पुन्हा सुरू केली.