देवेंद्र फडणवीस हे भाजपचे मुख्यमंत्री असतील गिरीश महाजनांचे विधान
बुधवार, 18 सप्टेंबर 2024 (13:21 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नाही. वर्षाच्या अखेरीस ऑक्टोबर -नोव्हेंबर मध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्व राजकीय पक्ष या निवडणुकांसाठी तयारीला लागले आहे.
विविध पक्षांच्या नेत्यांकडून विधाने केली जात आहे. राज्य सरकारचे मंत्री गिरीश महाजन यांनी महायुती निवडणुका जिंकली आणि मुख्यमंत्री बनवायचे असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे विधान केले आहे.
आमच्या मनात भाजपचा मुख्यमंत्री कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे. गिरीश महाजन यांनी सोलापुरात आयोजित एका कार्यक्रमात हे विधान केले.
ते म्हणाले, 15 ते 20 दिवसांत आचारसंहिता लागू होणार असून महायुतीचाच विजय होणार असून मुख्यमंत्री महायुतीचाच असणार. असे म्हणाले.
महायुतीमध्ये भाजप 155 ते 160 जागा लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचा मुख्यमंत्री करावा लागला तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस व्हावे अशी मनापासून इच्छा आहे. सर्व अधिकार पक्षश्रेष्ठींना आहे. आमच्या मनातील मुख्यमंत्री कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे.
मराठा आरक्षणा बाबत मनोज जरांगे यांच्या उपोषणाबद्दल ते म्हणाले, जे नियमांच्या चौकटीत आहे राज्य सरकार तेच करू शकेल. नियमांच्या बाहेर काहीही करता येणार नाही. असे गिरीश महाजन म्हणाले.