वाढत्या महागाईत राज्य सरकारने दिला दिलासा; अजित पवार यांची घोषणा

शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (14:52 IST)
इंधनासह सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढत असल्याने सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. त्यात आता राज्य सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र, हा दिलासा केवळ मुंबईकरांनाच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार राज्यातील ‘सीएनजी’,‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर आज १ एप्रिल २०२२ पासून १३.५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी झाल्यानं राज्यात घराघरांत पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसेच वाहनांसाठीचा सीएनजी इंधन स्वस्त झाला आहे. मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो ६ रु. स्वस्त, पीएनजी हा पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस प्रति एससीएम (स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर) ३ रु. ५० पैशांनी स्वस्त झाला आहे. मुंबई परिसरात नवीन दराप्रमाणे सीएनजी ६० रु. प्रति किलो तर पीएनजी ३६ रु. प्रति एससीएम असेल.या निर्णयामुळे मुंबई परिसरातील लाखो नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती