दही हांडी उत्सवातील गोविंदांना 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याची राज्यसरकारची घोषणा
शुक्रवार, 26 जुलै 2024 (17:08 IST)
दही हांडी उत्सव महाराष्ट्रात जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात गोविंदा पथक मोठ्या संख्येने भाग घेतात. या उत्सवात मनोरे रचताना गोविंदाचा पडून अपघात होतो. किंवा काही जण मृत्युमुखी होतात.
या उत्सवासाठी राज्यसरकार कडून गोविंदांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. दही हंडी उत्सवात मनोरे रचताना अपघातात गोविंदांचा मृत्यू झाल्यास राज्य सरकार 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण द्वारा 10 लाख रुपयांची विमा रक्कम देणार आहे.
या उत्सवात दोन्ही हात किंवा दोन्ही डोळे गमावलेल्या गोविंदांना 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. राज्य सरकारने राज्यातील 75 हजार गोविंदांचा विमा उतरवणार आहे.
दही हंडी उत्सवात एक हात एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास रुपये 5 लाख पर्यंतच्या विमाचा लाभ मिळेल. गोविंदा जखमी झाल्यास एक लाखाची मदत मिळणार.
27 ऑगस्ट रोजी दही हांडी उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवाचे आयोजन राज्यातील विविध शहरांमध्ये केले जाते. या उत्सवात लहान मोठे तरुण तरुणी उत्साहाने सहभागी होतात. हा महाराष्ट्रातील मोठ्या सणांपैकी एक आहे.