राज्य सरकारकडून २५ मराठी चित्रपटांना अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे. तब्बल ८ कोटी रुपयांचे अनुदान वितरित होणार आहे. त्याची यादी सरकारने जाहीर केली आहे. यामध्ये काही चित्रपटांना ३९ लाख रुपये तर काही चित्रपटांना २९ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. या २५ चित्रपटांना ८ कोटी रुपये अनुदान वितरित करण्यात येत आहे. अ दर्जाच्या चित्रपटांना ३९ लाख रुपये तर ब दर्जाच्या चित्रपटांना २९ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
अ दर्जाचे चित्रपट
दशक्रिया, बार्डो, बापजन्म, झिपऱ्या, रिडिमिक्स, बॉईज, सुरसपाटा, एक सांगायचय अनसेड हार्मोनी, मिस यु मिस्टर, वेडिंगचा सिनेमा, स्माईल प्लिझ, येरे येरे पैसा, मन उधान वारा
ब दर्जाचे चित्रपट
सन १९८१, एचटूओ कहाणी थेंबाची, जजमेंट, शिमगा, सिटीझन, लव्ह यू जिंदगी, लकी, रंगिला रायबा, हॅप्पी बर्थडे, पल्याडवासी, पोशिंदा, हाक.