एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत संपावर ?

शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (08:03 IST)
दिवाळीचा सण अवघ्या १० दिवसांवर येऊ ठेपल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. आमच्या मागण्यांचा गांभिर्याने विचार करा अन्यथा दिवाळी पूर्वी किंवा दिवाळीतच संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. यासंदर्भात संघटनेने मुख्यमंत्र्यांना निर्वाणीचे पत्र दिले आहे. या संपाच्या इशाऱ्यामुळे प्रवाशांचे दिवाळीतच मोठे हाल होण्याची चिन्हे आहेत. 

संघटनेने पत्रात म्हटले आहे की, आम्हाला वेतनासाठी सातत्याने तिष्ठत रहावे लागते. वेळेवर वेतन होत नाही. वेतनही अत्यल्पच आहे. गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये परिवहन सेवा ही राज्य सरकार चालवले. त्यामुळे तेथील एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व लाभ मिळतात. त्यात वेतन, भत्ते, सोयी-सवलती आदींचा समावेश असतो. महाराष्ट्रात मात्र तसे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहिरनाम्यात म्हटले होते की, एसटी कर्चाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते दिले जाते. त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. कृपया आमचा संयम पाहू नये. संकटांमुळेच एसटी कर्मचारी आत्महत्या करीत आहेत. कर्मचाऱ्यांच्या रोषाचा सामना न करता आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती