मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्यांची सोय

शुक्रवार, 12 मार्च 2021 (08:58 IST)
मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्यांची सोय केली आहे. मध्य रेल्वे मुंबई ते मदुराई/ सुलतानपूर / एर्नाकुलम तसेच पुणे व अहमदाबाद या मार्गावर विशेष गाड्या चालविणार असून, लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती त्यांच्या वेबसाइटवर देण्यात येणार आहे.
 
लोकमान्य टिळक टर्मिनस- मदुराई सुपरफास्ट
लोकमान्य टिळक टर्मिनस- मदुराई पर्यंत विशेष साप्ताहिक गाड्या सोडण्यात येत आहे. 01201 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १७ मार्च २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर बुधवारी १३.१५ वाजता सुटेल आणि मदुराईला दुसर्‍या दिवशी १८.१० वाजता पोहोचेल. याशिवाय, 01202 विशेष मदुराई येथून १९ मार्च२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर शुक्रवारी १५.५० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी २०.३० वाजता पोहोचेल. या गाड्या ठाणे, कल्याण, कर्जत (केवळ 01201 साठी), पुणे, दौंड, सोलापूर, कलबुरागी, शहाबाद, वाडी, रायचूर, मंत्रालयम रोड,अदोनी,गुंटकल, गुट्टी, कडप्पा, राजमपेटा, रेनीगुंटा, तिरुत्तानी, कांचीपुरम, चेन्गलपट्टू, विल्लुपुरम, वृद्धाचलम, तिरुचिराप्पल्ली जं., दिंडीगुल या स्थानकांवर थांबणार आहे. यामध्ये १ द्वितीय वातानुकुलीत, ४ तृतीय वातानुकुलीत,१२ शयनयान, ३ द्वितीय आसन श्रेणी या सुविधा उपलब्ध आहेत.
 
लोकमान्य टिळक टर्मिनस-सुलतानपूर सुपरफास्ट विशेष (साप्ताहिक)
02143 विशेष २१ मार्च२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर रविवारी १५.५० वाजता सुटेल आणि सुलतानपूरला दुसऱ्या दिवशी १८.१० वाजता पोहोचेल. 02144 विशेष २३ मार्च २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत सुलतानपूर येथून दर मंगळवारी ०४.०५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी ०७.२५ वाजता पोहोचेल. या गाड्या नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, भोपाळ, बीना, झांसी, उरई, कानपूर, लखनऊ, निहालगड, मुसाफिरखाना या स्थानकांवर थांबणार आहे. यामध्ये १ द्वितीय वातानुकुलीत, ४ तृतीय वातानुकुलीत, १२ शयनयान, ३ द्वितीय आसन श्रेणी उपलब्ध आहे.
 
लोकमान्य टिळक टर्मिनस – एर्नाकुलम सुपरफास्ट दुरंतो विशेष (द्वि-साप्ताहिक)
01223 विशेष १६ मार्च २०२१ ते ८ मार्च २०२१ पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी २०.५० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १८.१० वाजता एर्नाकुलम येथे पोहोचेल. 01224 विशेष १७ मार्च २०२१ ते ६ मार्च २०२१ पर्यंत एर्नाकुलम येथून प्रत्येक बुधवार आणि रविवारी २१.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी १८.१५ वाजता पोहोचेल. या गाड्या रत्नागिरी, मडगाव, मंगलुरू जंक्शन, कोझिकोड या स्थानकांवर थांबतील. यामध्ये १ वातानुकुलीत प्रथम श्रेणी, २ द्वितीय वातानुकुलीत, ८ तृतीय वातानुकुलीत, १ पेंट्री कार उपलब्ध असणार आहे.
 
पुणे-अहमदाबाद सुपरफास्ट दुरंतो विशेष (त्रि-साप्ताहिक)
02298 विशेष १५ मार्च २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे येथून प्रत्येक सोमवारी,गुरुवारी आणि शनिवारी २१.३५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०६.४० वाजता अहमदाबादला पोहोचेल. 02297 विशेष १६ मार्च २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबाद येथून प्रत्येक मंगळवार, शुक्रवार व रविवारी २२.३० वाजता सुटेल आणि पुण्याला दुसर्‍या दिवशी ०७.१० वाजता पोहोचेल. या गाड्या लोणावळा आणि वसई रोड याच स्थानकांवर थांबणार आहेत. यामध्ये १ वातानुकुलीत प्रथम श्रेणी, ३ द्वितीय वातानुकुलीत, ९ तृतीय वातानुकुलीत श्रेणी उपलब्ध असणार आहे.
 
आरक्षण: पूर्णपणे आरक्षित सुपरफास्ट विशेष गाडी क्र. .01201आणि 02143 साठी आरक्षण सामान्य भाडे दराने आणि सुपरफास्ट दुरांतो विशेष गाडी क्र. 02298 आणि 01223 साठी आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर  १२ मार्च २०२१ पासून सुरू होतील. उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती