सचिन सावंत यांचे भाजपाला खडे बोल

शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (15:49 IST)
शेतकरी आंदोलनाबद्दल भाजपाच्या नेत्यांकडून खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही असल्याचा आरोप केला जात आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपालाकंगना राणौतला पाठिंबा दिल्याचे स्मरण करून देत खडेबोल सुनावले आहेत.
 
सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. "देशात अन्नदात्याचा सन्मान सर्वोतोपरी आहे. त्याला खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांची साथ दिली. मुंबई पोलिसांना माफिया, मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?,” असा सवाल सचिन सावंत यांनी भाजपाला केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती