माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले की, वास्तविकरित्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणजे यांनी माफी कशी मागावी याची तयारी सुरु केली पाहिजे. १०० कोटींचा दावा मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केला आहे. आता कितीची पेनल्टी आणि दंड व्हावा हे न्यायालय ठरवेल यातील एकही पैसा आम्हाला नको आहे. सर्व पैसे धर्मदाय संस्थेला द्यावेत परंतु महाराष्ट्रातील जनतेला संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माफी पाहिजे आहे. कारण ज्या प्रकारे दहशत सुरु आहे. नेव्ही ऑफिसरच्या घरी जाऊन मारणे, जीवे मारण्याचे काम करणं म्हणून उद्धव ठाकरेंना एकदा तरी धडा शिकवायचा होता. १०० कोटींचा शौचालय घोटाळा आता कळेल ही स्वस्त प्रसिद्धी घेताना आपण महाराष्ट्रातील नागरिकांची मानहानी आणि दहशत उभा करण्याचा प्रयत्न करत असेल तर या पापाचे फळ तुम्हाला मिळेल असे सोमय्या म्हणाले आहेत.