दुहेरी हत्याकांड; औरंगाबाद येथे पती पत्नीची निर्घृण हत्या
सोमवार, 23 मे 2022 (12:38 IST)
राज्यात औरंगाबाद दुहेरी हत्याकांडाने हादरलं आहे. औरंगाबादातील पुंडलिकनगर परिसरात हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या शामसुंदर हिरालाल कलंत्री(55) आणि किरण शामसुंदर कलंत्री(45) यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून त्यांचे मृतदेह राहत्या घरी कुजलेल्या अवस्थेत आढळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचे मृतदेह इमारतीच्या वेगवेगळ्या मजल्यावर पलंगाखाली आढळले. त्यांची हत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनास पाठविले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहे.