डाय करूनही केस पांढरेच राहिल्यानं महिलेने सलून चालकाला झोडलं

5 हजार रुपये खर्च करुन डाय केलेले केस पांढरेच राहिल्यानं महिलेचा रुद्रावतार बघायला मिळाला. महिलेनं ब्युटी पार्लर चालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोलापूरात सात रस्ता येथे डायमंड नावाचे हेअर सलुन आणि ब्युटी पार्लर येथे घडली. 
 
या महिलेने सलूनची तोडफोड केली आणि सलूनच्या मालकाला चपलने मारहाण केली. हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये झाला. मोहम्मद साजिद सलमाने यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वर्षा काळे असे मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
 
नेमकं काय घडलं?
आयकर भवन सोसायटी, सोलापूर रहिवासी वर्षा काळे नावाच्या या महिलेने सात रस्ता येथे डायमंड नावाचे हेअर सलुन व ब्युटी पार्लर या ठिकाणी 19 ऑगस्ट रोजी हेअर कट आणि हेअर डाय केले होते. यासाठी सलून कडून 5 हजार रुपये बिल आकारण्यात आले होते. काही दिवसानंतर महिलेला काळ्या केसांमध्ये पांढरे केस दिसू लागले. त्यावरून चिडून ही महिला 5 सप्टेंबर रोजी सलून आली आणि शिवीगाळ करु लागले.
 
पैसे परत दे असे म्हणत महिलेने चप्पलने मालकाला मारहाण केली. स्वतःला वाचवण्यासाठी सलून चालक दुकानाबाहेर आला असता बाहेरील बाजूस वर्षा काळे या महिलेने चप्पल फेकून मारली. त्यानंतर तिथल्या इतर कामगारांना देखील चप्पलने मारहाण केली. ही माहिती ब्युटी पार्लर चालकाने तक्रार नोंदवताना दिली.
 
ते म्हणाले की काही दिवसात नैसर्गिकरित्या नव्याने केस पांढरे उगवत होते. केसांना पुन्हा एकदा काळे करावे लागेल असे सांगितले जात असताना ही महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने चप्पलने मारहाण केली व दुकानातील काचा फोडल्या. याबाबत आम्ही सदर बाजार पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती