त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी बडबड करणं बंद करावी - निशाणा नारायण राणेंचा

शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (07:51 IST)
महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गटाच्या युतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा धुरळा जरी उडाला असला तरी भाजपा आणि ठाकरे गटाने सावध पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय.
 
अंधेरीची पोटनिवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि शिंदे गट- भाजपासाठी लिटमस टेस्ट आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असून मतदार कोणाला कौल देतात याकडे सर्वांतं लक्ष आहे. मात्र याचदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा साधला आहे.
 
भाजपा उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणार; रवींद्र वायकरांनी समजावलं मतांचे गणित
उद्धव ठाकरे यांच्याकडे आता काही राहिले नाही. राज्य गेलं, मुंबई गेली. आता दक्षिण मुंबईतही भाजपाचाच खासदार जिंकून येणार असं नारायण राणे यांनी म्हटलं. तसेच दिवगंत रमेश लटके आज असते, तर ते शिंदे गटात असते, असं विधानही नारायण राणेंनी केलं. हिंमत असेल तर सरकार पडून दाखवा, असे म्हणत होते. अखेर आम्ही सरकार पाडून दाखवलं. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी बडबड करणं बंद करावी, असा निशाणा नारायण राणेंनी लगावला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती