लटके यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे उद्धव ठाकरे गटाने आपला ‘प्लॅन बी’ तयार

बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (21:00 IST)
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेचे दिवंगत नेते रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावावर जवळ-जवळ शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात आहे. लटके यांचा मुंबई पालकेतील नोकरीचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. दुसरीकडे लटके यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गटाकडूनही प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे. याच कारणामुळे लटके यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे उद्धव ठाकरे गटाने आपला ‘प्लॅन बी’ तयार ठेवल्याचे म्हटले जात आहे. ऋतुजा लटके यांना उमेदवारी देता आली नाही, तर दुसरा पर्याय कोण यावर उद्धव ठाकरे गटात खल सुरु असल्याचे म्हटले जात आहे. याबाबतचे सविस्तर वृत्ता ‘एबीपी माझा’ने दिले आहे.
 
या वृत्तानुसार ऋुतुजा लटके या शिंदे गटात गेल्या किंवा त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही, तर उद्धव ठाकरे गटाने प्लॅन बी आखल्याचे म्हटले जात आहे. या योजनेनुसार ऋतुजा लटके निवडणुकीत उतरल्या नाहीत तर कते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती