माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, बांगलादेशी स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्याच्या प्रयत्नात, महाराष्ट्र सरकारने 'विलंबित' अर्जांवर जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांच्या मुद्द्याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे
मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) अधिकाऱ्याने एका वृत्तपत्राला माहिती देतांना सांगितले की, महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी विलंब झालेल्या अर्जांवर जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांच्या मुद्द्याची चौकशी करेल. विलंबित अर्ज हे असे अर्ज आहेत जे एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या किंवा मृत्यूच्या किमान एक वर्षानंतर संबंधित प्रमाणपत्रासाठी केले जातात.
विलंबित अर्ज प्रकरणातील एसआयटी तपासाची पुष्टी करताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीटीआयला सांगितले की, आधीच जारी केलेल्या प्रमाणपत्रांची आणि प्राप्त झालेल्या अर्जांची चौकशी केली जाईल. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हे तपास पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.