रविवारी सुट्टी असल्याने ही बँक बंद होती. सायरनच्या आवाजानंतर माहिती मिळताच बँकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र हा सर्व प्रकार पाल सायरनमध्ये घुसल्यामुळे उघड झालं.
बीडच्या पाटोदा शहरातील बस स्टँडसमोर महेश मल्टिस्टेट बँकेची शाखा आहे. दुपारी अचानक सुरक्षा अलार्म वाजल्याने परिसरात एकच गोंधळ उडला. सायरन वाजल्यावर नागरिकांनी बँकेकडे धाव घेतली.