''मला आयुष्यात स्ट्रगल करणे खूप कठीण आहे. तसे माझ्या घरातील लोकांना समजावून सांग'', असा मेसेज तरुणाने आपल्या खास मित्राला पाठवून गळफास घेत आत्महत्या केली. शिरशिंगे वीरवाडी येथील 22 वर्षीय तरुणाने माजगाव येथे भाड्याच्या घरात हे टोकाचं पाऊल उचललं. साहिल सुनिल राऊळ असं त्याचं नाव आहे. साहिल चार दिवसांपूर्वी माजगाव येथे राहायला होता.
मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गावामध्ये राहणाऱ्या साहिलने आयटीआयचे शिक्षण घेतले होते. तो माजगाव उद्यमनगर येथील एका कंपनीत अपरेटिस म्हणून तर संध्याकाळी शहरातील एका चायनिजच्या दुकानात काम करत होता. सोमवारी दुपारी त्याचा मित्र सुंदर सिताराम राऊळला त्याने दुपारी 12 वाजेच्या सुमारास ''मला आयुष्यात स्ट्रगल करणे कठीण आहे. ते माझ्या घरातील लोकांना समजावून सांग'', असा मेसेज पाठवला. तेव्हा मित्राने काय झाले हे विचारण्यासाठी फोन केला पण त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे त्याला संशय आल्याने तात्काळ भाऊ न्हानू सोबत ते शिरशिंगे येथून माजगाव येथे आले.