धक्कादायक ! पोटच्या मुलांना पेटवून महिलेची आत्महत्या

शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (13:10 IST)
कौटुंबिक वादाच्या कारणातून एका आईने आपल्या दोन मुलांना पेटवून गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे आई आणि दोन्ही मुलांचा अंत झाला . दीक्षा आईचे नाव आणि सिंचा आणि धनंजय अशी मयत मुलांची  नावे आहे. ही घटना कुलबुर्ग येथील आहे. 
 
सोलापुरातील कलबुर्गी येथील स्टेशन बाजार परिसरात राहणाऱ्या दीक्षा हिचे आपल्या कौटुंबासह वाद होते. रागाच्या भरात येऊन तिने मुलगी सिंचा (2), मुलगा धनंजय(3), यांचा वर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. या मध्ये दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून दुर्देवी अंत झाला. नंतर महिलेने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती