ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (13:08 IST)
ऐन दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. दिवाळीच्या दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे असून 2 नोव्हेंबरनंतर चार ते पाच दिवस काही भागांत पावसाळी स्थिती राहण्याची शक्यता आहे.
 
दक्षिण आणि पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. हा पट्टी निर्माण झाला तर 2 ते 10 नोव्हेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता कमी असल्यामुळे हा पाऊस 6 ते 11 नोव्हेंबरदरम्यान पडले, अशी शक्यता आहे.
 
राज्यात सध्या रात्री हलका गारवा जाणवत असून मध्य महाराष्ट्रात नगर, जळगाव वगळता सर्वत्र किमान तापमान सरासरीच्या जवळ आहे. कोकण विभागात मुंबई परिसरात ते सरासरीपेक्षा 1 अंशांने अधिक आहे. मराठवाड्यातील किमान तापमान सरासरीप्रमाणे आहे. विदर्भात अमरावती, ब्रह्मपुरी गोंदिया भागात किमान तापमान सरासरीच्या खाली असल्याने तेथे रात्रीचा गारवा जाणवत आहे.
 
देशाच्या दक्षिण भागात सध्या पाऊस होतो आहे. पुढील एक दिवसात बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनरपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहेत. याचा परिणाम राज्यावर काही प्रमाणात होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात 2 नोव्हेंबरपासून दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक भागात पावसाची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती