धक्कादायक : भावी डॉक्टर विद्यार्थिनीची आत्महत्या!

शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (08:16 IST)
साकेगाव जवळील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या द्वितीय वर्षात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने शुक्रवारी संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करीत स्वतःचे जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मू.जे.महाविद्यालयाच्या मागे असलेल्या समर्थ कॉलनीत राहणारी वैष्णवी किशोर लोखंडे (वय-२२) ही विद्यार्थिनी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती. शुक्रवारी दुपारी राहत्या घरी तिने गळफास घेत जीवन संपविले. संध्याकाळी ७:३० वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला आहे. सीएमओ डॉ.नीता भोळे यांनी तिला तपासून मृत घोषित केले. उद्या सकाळी तिच्या मृतदेहावर शवविच्छेदन होणार आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नाशिक येथील वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयमध्ये एका तरुणाने रॅगिंगच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच आता जळगावमध्ये देखील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
 
वैष्णवी अभ्यासामध्ये हुशार होती. ती नेहमी सर्वांशी मनमिळावूपणे वागायची, असे तिच्या मित्र-मैत्रिणींनी सांगितले. दरम्यान, तिला परीक्षांमध्ये कमी मार्क पडले होते, त्यामुळे ती काहीशी नाराजी होती. त्यामुळे तिने आत्महत्या केली असावी अशी चर्चा मित्र-मैत्रिणींमध्ये आहे.दरम्यान मुलीने आत्महत्या केल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला आहे.तीचे वडील किशोर लोखंडे हे जळगाव शहरातील महापौर जयश्री महाजन यांच्या या.दे.पाटील माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहे. याबाबत पुढील तपास रामानंद नगर पोलीस करीत आहे. मयत वैष्णवीच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती