ही घटना घडली तेव्हा गावातील रामलिंग तानवडे भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते त्यांच्या समवेत त्यांच्या दोन मुली समीक्षा आणि अर्पिता तानवडे आणि त्यांच्या मेहुण्यांची मुलं आरती आणि विठ्ठल पारशेट्टी देखील नदीपात्रात पोहण्यासाठी आले.या चौघा मुलांपैकी समीक्षा आणि अर्पिता या दोघींना पोहता येत होते पण दुर्देवाने विठ्ठल आणि आरती या दोघांना येत नव्हते.अशा परिस्थितीत नदीपात्राचे अंदाज त्या दोघांना माहित नसल्याने ते दोघे बुडू लागले.तानवडे बहिणींनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असताना त्या देखील पाण्यात ओढल्या गेल्या आणि बुडाल्या.