धक्कादायक ! कर्ज थकले, शेतकरी महिलेकडे बँक प्रतिनिधीची शरीरसुखाची मागणी

गुरूवार, 5 मार्च 2020 (17:14 IST)
शेतकरी महिलेकडे ट्रॅक्टरच्या कर्जाचे हफ्ते थकले असल्याने त्यांच्या वसुलीसाठी गेलेल्या एका बँकेच्या प्रतिनिधीने शेतकरी महिलेला शरीरसुखाची मागणी केली. महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळच्या घाटंजी येथे उघडकीस आला आहे. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. त्यानंतर थेट पोलीस अधिक्षकांकडून तक्रार केली.
 
घाटंजीच्या मोवाडा येथे हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेली असता पोलिसांनी तक्रार घेतली नाही. त्यानंतर महिलेने थेट पोलीस अधिक्षकांना तक्रार दिल्यावर घाटंजी पोलिसांनी इंडसइंड बँकेचा प्रतिनिधी सुरज गजभिये विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मोवाडा येथील या पीडित शेतकरी महिलेने इंडसइंड बँकेकडून अर्थसहाय्य घेऊन शेतीकरिता ट्रॅक्टर खरेदी केला होता. त्याचे दोन हप्ते भरण्यात आले. मात्र तिसरा हप्ता थकला होता.
 
बँकेचा थकित हप्ता न भरल्याने याच्या वसुलीसाठी बँक प्रतिनिधी सुरज गजभिये सह चौघेजण महिलेच्या घरी धडकले, पैकी तिघांनी ट्रॅक्टर जप्त करून नेला तर सुरज गजभियेने टॅक्टर सदंर्भात माहिती देण्याच्या बहाण्याने महिलेला पाणी आणायला सांगितले. यावेळी महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला शरीर सुखाची मागणी केली. पीडित महिलेने आरडा ओरड केल्याने शिवीगाळ करून आरोपी पसार झाला.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती