मालवणात गोवा कार्निवलच्या धर्तीवर शोभा यात्रेचे नियोजन

गुरूवार, 2 मार्च 2023 (08:33 IST)
हिंदू नववर्षानिमित्त निघणार स्वागत यात्रा ; संस्कृती, लोककला, देखावे, चित्ररथ यांचा मिलाप
social media
हिंदू संस्कृती आणि लोककलांचा मिलाफ असणारी भव्य-दिव्य अशा स्वरुपाची हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मालवण येथे काढण्यात येणार आहे. गोव्यामधील कार्निवलच्या धर्तीवर यंदा विविध देखावे यंदाच्या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.भरड, दत्त दत्त मंदिर येथे गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे नियोजन करण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवक व विविध संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले.यावेळी भाऊ सामंत, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, सौगंधराज बादेकर, संदीप बोडवे, अमित खोत, राजू बिडये, कृष्णा ढोलम, ललित चव्हाण, दुर्गेश गावकर, सुनील पोळ, भिवा शिरोडकर, राजन कामत, गणेश मेस्त्री, हर्षद हळदणकर, सुशांत तायशेटे आदी उपस्थित होते.
 
वारकरी, बजरंग दल होणार सामील
 
हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत यंदा वारकरी पंथाचे स्त्री-पुरुष वारकरी बांधव, वारकरी वेशभूषेत स्वागत यात्रेत सामील होणार आहेत. याबाबतच्या नियोजनाची जबाबदारी संप्रदायाचे सहकारी सुनील पोळ यांच्याकडे देण्यात आली. त्याचप्रमाणे यंदा विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलाचे कार्यकर्तेही हातात भगवा ध्वज घेऊन रॅलीत सहभागी होणार असल्याचे मालवण बजरंग दल प्रमुख हर्षद हळदणकर यांनी सांगितले
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती