शिवरायांचा पुतळा प्रशासनाने हटवला, 20 जणांवर गुन्हा दाखल

बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (21:22 IST)
जालना तालुक्यातील सेवली येथे काही शिवप्रेमींनी सोमवारी (ता.14 फेब्रुवारी ) बसलेला शिवरायांचा पुतळा प्रशासनानं आता  हटवला आहे. मंगळवारी रात्री अज्ञातांनी सेवली गावातल्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. त्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होत. शिवाय वीस जणांवर गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे.
 
दरम्यान याच भागातील एक वडाच्या झाडाखाली रोवलेला  हिरवा झेंडा ही काढण्यात आला असून या प्रकरणी २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना तालुक्यातील सेवली गावाच्या चौकात काही शिवप्रेमींनी सोमवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या  अश्वारुढ पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना केली होती. मात्र, हा पुतळा स्थापना करताना प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे मंगळवारीप्रशासनाची धावपळ सुरू होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती