जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून नाशिकमध्ये महाविकास आघाडीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. पालकमंत्री आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ठेकेदारांना निधी विकत असल्याचा आरोप नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.निधी वाटपावरून त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
भुजबळ जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करीत मर्जीतील आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना कामे देत असल्याचा गंभीर आरोपही कांदे यांनी केला आहे.भुजबळांनी मात्र या आरोपांचे खंडन केले आहे. नांदगावच्या आढावा बैठकीत भुजबळ - कांदे यांच्यात खडाजंगी झाली होती.आमदार कांदे हे भुजबळ पुत्र माजी आमदार पंकज भुजबळ यांचा पराभव करून नांदगावमधून विजयी झाले आहे.