शिवसेना नेते संजय राऊत यांनी हल्लाबोल केला, म्हणाले, मोदी,शहा यांनी पेगासस हेरगिरी प्रकरणावर स्पष्टीकरण द्यावे

सोमवार, 19 जुलै 2021 (15:05 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी इस्रायलच्या स्पायवेअर पेगाससच्या माध्यमातून पत्रकारांसह अनेक जणांची हेरगिरी केल्याच्या मुद्यावर स्पष्टीकरण द्यावे,असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना सोमवारी सांगितले की त्यातून देशातील "सरकार आणि प्रशासन कमकुवत" असल्याचे दिसून आले.
 
राज्यसभा सदस्य राऊत म्हणाले, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी या विषयावर स्पष्टीकरण द्यावे.आंतरराष्ट्रीय मीडिया संस्थेने उघडकीस आणले आहे की केवळ सरकारी संस्थांना विकलेले इस्रायलच्या गुप्तचर हेरगिरीचे सॉफ्टवेअर पेगाससच्या माध्यमातून भारताचे दोन केंद्रीय मंत्री,40 हून अधिक पत्रकार,तीन विरोधी नेते आणि एक न्यायाधीश यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी,व्यावसायिक आणि अधिकार कार्यकर्त्यांचे 300 मोबाइल नंबर हॅक केले गेले असावेत. हा अहवाल रविवारी समोर आला. 
 
तथापि, सरकारने आपल्या पातळीवरील काही लोकांवर पाळत ठेवण्याशी संबंधित आरोपांना नकार दिला आहे. सरकारने म्हटले की, “यासंदर्भात कोणतेही ठोस आधार किंवा सत्य नाही.” राऊत म्हणाले की त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांच्याशी याबाबत बोललो आहे आणि पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला जाईल.
 
ते म्हणाले, महाराष्ट्रात कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला होता. वरिष्ठ पोलिस अधिकारी यात सामील होते आणि तपास सुरू आहे. परंतु या प्रकरणात, परदेशी कंपनी आमच्या लोकांचे, विशेषत: पत्रकारांचे फोन कॉल ऐकत आहे. हा एक गंभीर प्रश्न आहे.
 
ते म्हणाले, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोनही टॅप केला जात असेल तर ह्यात काही आश्चर्य वाटणार नाही.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती