हा अपघात सायंकाळी सिंदी दिगर घाटात घडला.ही प्रवासी वाहतूक करणारी खासगी जीप सायंकाळी या घाटात कोसळली.या मध्ये 30 प्रवासी होते.हा अपघात इतका भीषण होता की दरीत जीप कोसळून जीपचा चुरडा झाला.या अपघातात 8 जण मृत्यू मुखी झाले तर 15 पेक्षा जास्त प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.या अपघातात मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.